*नारायणगाव -* *शिक्षक,प्राध्यापक,पोलीस, अंगणवाडी सेविका,आशावर्कर,पत्रकार,ग्रामपंचायत कर्मचारी,र्डाॕक्टरर्स यांना ५० लाख रुपयाचे विमा सं रक्षण मिळावे*...


नारायणगाव - संदीप नाईक , उपसंपादक
 *पोलीस प्रवाह न्यूज* 


 दि.२८/५/२०२० *शिक्षक,प्राध्यापक,पोलीस,  अंगणवाडी  सेविका,आशावर्कर,पत्रकार,ग्रामपंचायत कर्मचारी,र्डाॕक्टरर्स यांना ५० लाख रुपयाचे विमा सं रक्षण मिळावे*
   महाराष्ट्रराज्यत कोरोना विषाणू ने थैमान घातलेले आहे.मुंबई मधे सर्वाधीक रुग्ण संख्या आहे त्या खालोखाल पुणे,ठाणे, कल्याण , औरंगाबाद,मालेगांव, नागपूर, सांगली,सातारा ,सोलापूर, अशा अनेक भागात कोरोना चे थैमान पहावयास मिळते. चौथ्या लाॕकडाऊन च्या काळात महाराष्ट्र शासनाने  काही प्रमाणात शिथलता दिली आहे. त्या मुळे राज्यातील व परराज्यातील कामगारांना आपआपल्या गावा कडे जाता येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील गावाकाडील अनेक मध्यमवर्गीय लोक कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास आहे    त्याही लोकांना आपल्या गावाकडे घराकडे परतण्याची घाई झाली   व ई पास घेऊन ही मंडळी  गावाकडे  निघालेत सुध्दा काही गावा गावात पोहचलेत  त्यांची तपासणी करणे, त्यांना कोरंटाईन करने,कायदा सुव्यवस्था राखणे,यांची जेवानापासून सर्व व्यवस्था करणे  इत्यादी कामे पोलीसांना,आरोग्य विभागाला,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,ह्या व्यक्तींना करावी लागतात  तसेच विविध कामामुळे पोलीसांवरील आलेला ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अता प्रायमरी शिक्षक,हायस्कुल टिचर, काॕलेजचे प्राध्यापक ,यांना ग्रामीण भागात तालूक्यातील चेकपोष्ट वर पोलीसांप्रमाणे आलेल्या गाड्या आलेल्या व्यक्ती यांची माहीती घेणे त्यांना कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळतात का ते पहाणे या साठी तैनात केले आहे तसेच अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत सरपंच व कर्मचारी,आशावर्कर घराघरात जाऊन माहीती घेतात पत्रकार बंधू ग्राऊंड लेव्हलला जाऊन रिपोर्टींग करता परंतू या व्यक्तींना  कोणतेही प्रशिक्षण दिले गेलेले दिसत नाही. त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही आसे दिसते  खरं तर या कोरोना योध्यांची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी होती परंतु तसे काही होताना दिसत नाही   सर्व प्रशासनातील  ह्या व्यक्ती  काम करायला तयार आहेत परंतु त्यांचे म्हणणे असे आहे कि आमचे कोरोना सारख्या संसर्गात  काही बरे वाईट झाले तर आमच्या कुटूंबाची जबाबदारी कोण घेणार म्हणून त्यांची शासन दरबारी मागणी आहे अम्हाला कमितकमी 50 लाखाचे विमा संरक्षण  मिळावे म्हणजे आम्हाला काम करताना घरचे टेंन्शन येनार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या