प्रतिनिधी - उस्मानाबाद :-
दिनांक 26 मे 2020 :- जोपर्यंत कोरोना बंदोबस्त आहे, तोपर्यंत महाराष्ट्र पोलीसांना डबल पगार देण्यात यावा .. अशी मागणी " पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या " वतीने संस्थापक :- अध्यक्ष :- प्रमोद तानाजी वाघमारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . तसेच प्रत्येक जिल्ह्यात तेथील पोलीसांची संख्या पाहून पोलीसांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल व अंबुलन्सची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 1600 पोलीसांना कोरोनाने ग्रासले असून 18 पोलीस शहीद झाले आहेत. दुसरीकडे दर आठवड्याला पोलीसांची कोरोना चाचणी होणार असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. असा प्रश्नही प्रमोद वाघमारे यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे.
पोलीसांची एक दिवसाची पगार कापून 30 ते 35 कोटी रुपये च्या आसपास पैसे जमा होऊन तेच पैसे कोरोनामध्ये शहीद झालेल्या पोलीसांना 50 लाखाच्या स्वरूपात दिले जातात, व नाव मात्र सरकारचे होते, असा आरोपही प्रमोद वाघमारे यांनी सरकार वरती केला आहे. या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे पोलीसांमध्ये व त्यांच्या कुटुंबियांमध्ये सरकर विरोधात नाराजीचा सूर पसरला आहे. असेही ते म्हणाले.
हरियाणा सरकारने मात्र पोलीसांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून, कोरोना बंदोबस्त असे पर्यंत पोलीसांना डबल पगार देण्यात येईल असे हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र पोलीसांना देखील डबल पगार देण्यात यावा. अन्यथा " पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या " वतीने आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरून आमच्या आई - वडिलांसाठी त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करावे लागेल. मग आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल.
याला सर्वस्वी जबाबदार सरकारच राहील. असा इशारा प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे. त्यांच्या या मागणीचे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले असून, योग्य मागणी असल्याचे सांगितले आहे.



1 टिप्पण्या
बरोबर मी पण पोलीस बॉय आहे
उत्तर द्याहटवायाआपला ग्रुप बनवा
9309574495