सातारा जिल्हा प्रतिनिधी - डॉ नामदेव शेगर
संपुर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही पसरलेली आहे. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून खूप सारे प्रयत्न होत आहेत. आणि या व्हायरसचा फैलाव लोकांच्याच गर्दीमुळे होताना दिसून येत आहे.आणि हीच गर्दी टाळण्यासाठी पोलिस, डॉक्टर, नगरपालिका कर्मचारी आपले काम चोख बजावत आहेत.
देशभरातील बहुतांश मंदिरे, दुकाने, कंपन्या, शाळा, कॉलेज , सरकारी कार्यालये आणि बँका बँद असून फक्त देशातील पोलीस ठाणे आणि हॉस्पिटल ही दोनच कार्यालये मात्र सुरू आहेत. देशसेवेसाठी खाकी वर्दी अन पांढरा कोट जागोजागी सज्ज आहे. तसेच पोलिसांकडून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. "आम्ही कर्तव्यावर आहोत, तुम्ही घरी बसा" असा संदेशही पोलिसांकडून आणि डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
राज्यभरात जवळपास दोन लाखानच्या आसपास पोलीस व डॉक्टर्स कर्मचारी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहेत. तरी याचपैकी काही पोलीस, डॉक्टर्स कोरोनाबधित झालेचे दिसून येत आहे. आणि काहींना या व्हायरसमुळे स्वतःचे प्राणही गमवावे लागले आहेत. काही ठिकाणी तर कोरोना संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व डॉक्टर्स यांच्यावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत, ही बाब दुर्दैवास्पद आहे...
पोलीस आणि डॉक्टर्स हे स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून आपल्या घराचे, राज्यातील तसेच संपूर्ण देशाचे संरक्षण करण्यासाठी ते धडपडत आहेत. तरीही प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की आपण स्वतः या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीआपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी करत या लढाईत पोलीस, डॉक्टर आणि नगरपालिका कर्मचारी यांना सहकार्य केले पाहिजे. म्हणजेच आपले गाव, आपला जिल्हा, आपलं राज्य आणि आपला देश कोरोनामुक्त लवकरात लवकर होईल.
आणि या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे पोलीस, डॉक्टर्स आणि नगरपालिका कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना माझा सलाम..



0 टिप्पण्या