वैभव सत्वे, प्रतिनिधी
माणगांव: दि. २१- कोरोना पुढे जग हतबल झाले आहे. मनुष्यहानी बरोबर आर्थिक व्यवस्था बिघडलेली आहे. यांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. जीवन कसे जगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते डॉ. संतोष कामेरकर, माणगांव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी व शहरप्रमुख अजित तार्लेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री माणगांवचे रहिवाशी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या तर्फे माणगांवमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे ५०० किट माणगांव शहरप्रमुख अजित तार्लेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
तसेच माणगांव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी यांच्यामार्फत त्यातील २५० किट आजूबाजूच्या खेडेपाड्यात गरजू व्यक्तींना वाटण्यात आले. व उर्वरित किट माणगांव शहरामध्ये शिवसेना नेते डॉ. संतोष कामेरकर, शहरप्रमुख अजित तार्लेकर, माजी शहरप्रमुख महेंद्र दळवी, युवासेना पदाधिकारी अजिंक्य जाधव आदी शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्फत दि. २१ मे रोजी गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तसेच गोरेगाव जवळील कुशेडे गावात कोरोना रुग्ण आढळल्याने गाव सील करण्यात आले होते. त्यामुळे कुशेडे गावातही ह्यातील जीवनावश्यक वस्तूचे किट पोहचविण्यात आल्याचे डॉ. संतोष कामेरकर यांनी बोलताना सांगितले. डॉ. कामेरकर यांनी जनतेला घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश दिला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वेळोवेळी माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करावे असे सांगितले. माणगांवकरातर्फे डॉ. संतोष कामेरकर यांनी मंत्री सुभाष देसाई यांचे आभार मानले.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या