जळगाव पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाने एम आय डी सी पोलिसांची कारवाई

          जळगाव पोलीस उपअधीक्षक डॉ निलाभ रोहन

जळगाव प्रतिनिधि - जितेंद्र चौधरी 

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे
एकीकडे देश संकटात आहे मात्र दुसरी कडे जळगावात संचार बंदी कलम 144 लागू असतांना शहरातील शिरसोली रोड वरील श्री श्री लेक रेसिडेन्सी येथे हायप्रोफाईल महिला किटी पार्टीत व्यस्त आहेत हया प्रकरणाची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ निलाभ रोहन यांना मिळाल्यावर त्यांनी कारवाई चे आदेश दिले त्या नंतर
एमआयडीसी पोलिसांनी 33 महीलांवर कारवाई केली
या महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची हि अवहेलना केली
देशात कोरोनाने थैमान घातलेले असतांना . संपूर्ण देश हा संकटात आहे प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या परीने जशे शक्य होईल तशी एकमेकांना मदत करीत आहे . जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे कलम १४४ लागू आहे पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही . संपूर्ण शासकीय निम शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे . इतके असल्या वरही मात्र जळगाव शहरात तलावाजवळ श्री श्री लेक रेसिडेन्सी या परिसरात जळगाव शहरातील काही उच्चभ्रू कुटुंबातील महिलांनी या सर्वांना पाठा दिला . या सर्वांनी एकत्र येत किटीपार्टी आयोजित केली होती . या किटीपार्टीत सोशल डिस्टन्स चा नियम धाब्यावर ठेवून पार्टी केली . हि माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी या 33 महीलांवर कारवाई करण्यात आली.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये याकरिता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तसेच जळगाव शहरात महापालिका व जळगाव शहराच्या दोन किलोमीटर परिघातील क्षेत्राकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात आधीच लागू असल्याने सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी थांबणे चर्चा करणे कार्यक्रमाचे आयोजन करणे यावर बंदी असतांना देखील जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील तेहतीस महिलांनी एकत्र येऊन पार्टीचे आयोजन केले होते . याची माहिती निर्भया पथकातील मंजू तिवारी त्यांना एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना आलेल्या वायरलेस कॉल वरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला बोलावले व त्यांनी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल तुकाराम निंबाळकर ,दीपक चौधरी ,पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, इमरान सैय्यद यांना बोलून  पोलीस उप अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आदेशाने जळगाव परिसरातील श्री श्री लेक सिटी शिरसोली रोड जळगाव येथे पाच पेक्षा जास्त महिलांनी जमून जेवणाचा कार्यक्रम आयोजन केला होता . अशी गोपनीय माहिती मिळाली असून त्या ठिकाणी रवाना केले .या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांवर कारवाई करा असे सांगितले त्यानुसार शिरसोली रोड श्री श्री लेक सिटी इमारतीच्या पार्किंगमध्ये सोशल डिस्टन्स पालन न करता ,तोंडाला रुमाल न लावता ,बर्‍याच महिला एकत्र जमलेल्या दिसल्या सदर महिला त्या जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करताना दिसले . या ठिकाणाच्या परिस्थितीचे गांभीर्य अधिकाऱ्यांना कळवून या महिलां वर सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचा संभव उद्भवू शकतो त्याने सदर जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून ताब्यात घेण्यात आले .असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे . पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंगपाटील हे करीत आहेत .                   
   ।।   पोलीस प्रवाह न्युज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या