कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे स्वयंशिस्तीने काटेकोर पालन करणे महत्वाचे : नगराध्यक्ष योगिता चव्हाण

रविंद्र कुवेसकर, प्रतिनीधी

माणगांव :दि  २२ - माणगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि केंद्र व राज्य सरकारी आदेशा प्रमाणेच माणगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व व्यवहार सुरु असून ३१/ ०५ /२०२० पर्यंत ते पुढील आदेशा पर्यंत लाॅकडाऊन कालावधित आदेशांची अंमलबजावणी होत आहे. आजच मिळालेल्या शासनाचे नविन सूचनांनुसार माणगांव बाजारपेठेतील दूकाने सकाळी ०९ .०० ते सायंकाळी ०५ .०० वाजे पर्यंत सुरु राहतील. तसेच कोणताही बदल स्थानिक नगरपंचायत प्रशासना कडून सूचविल्यास, तो माणगांवकरांस योग्य वेळी कळविण्यात येईल.

माणगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व  सूचनांचे काटेकोर पणे  स्वयंशिस्तीने पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच आपण या विषाणूला हरवू शकतो. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशी माहीती नगरपंचायत नगराध्यक्षा योगिताताई चव्हाण यांनी दिली आहे.

तसेच इतर शहरातून माणगांव नगरपंचायत हद्दीतील कुटुंबांमध्ये कोणीही व्यक्ती येत असेल तर त्याची पूर्व कल्पना माणगांव नगरपंचायतीस देणे बंधनकारक राहील. सध्या नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात इतर शहरातून नागरिक येत आहेत. त्यांना नगरपंचायत मार्फत योग्य ती खबरदारी घेत क्वारंटाईन करण्यात येत आहे.

जर असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर त्यांची माहीती तात्काळ नगरपंचायती मध्ये देण्यात यावी. तसेच नागरिकांनी सॅनिटायझर, मास्क व फिजीकल डिस्टन्सिंग या नियमांचे, आपले आद्य कर्तव्य समजून पालन करावे. तसेच दूकानात येणारे ग्राहक फिजीकल डिस्टन्सींग चे पालन करीत आहेत याची काळजी दूकानदारांनी घ्यावी. माणगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

                            पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या