रविंद्र कुवेसकर,प्रतिनिधी
माणगांव, दि. ६ - लोकक्षाहीचा चौथा स्तंभ आज वैश्विक कोरोना संकटात, संचारबंदीत जीवाची बाजी लावून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या अनेकांची वास्तव स्थिती, शासन सूचनांचे पालन करण्यासाठी समाजप्रबोधनपर माहिती आपल्या लेखणी द्वारे जनते पर्यंत पोहचविणे, गोरगरीब, दीन दूबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणली. भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी याच पत्रकारांनी आवाज उठविला आहे. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले. परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. याच गोष्टीच्या जाणीवेतून माणगांव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांनी मिळून एकमुखाने निर्णय घेतला असून राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना माणगांव तहसिलदार श्रीमती प्रियंका आयरे यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची हीच स्वाभिमानी प्रवृत्ती लक्षात घ्यावी. तसेच पत्रकारांना ही तातडीने मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठीच पत्रकारांना कमितकमी विमा संरक्षण तरी मिळावे या मागणीचा विचार व्हावा. म्हणुन आज दि. ६ मे रोजी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती वजा मागणीचे निवेदन माणगांव तालुका प्रेसक्लब च्या वतिने तहसिलदारांना सादर केले आहे. कोव्हिड १९ संदर्भात तातडीच्या सभेसाठी तहसिलदार बाहेर गेल्या असल्या कारणे नायब तहसिलदार बि. वाय. भाबड यांनी ते स्विकारले आहे.
या प्रसंगी माणगांव तालुका प्रेसक्लबचे पत्रकार अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, जेष्ठ सल्लागार रविंद्र कुवेसकर या तिघांनी प्रातिनिधीक म्हणुन एकत्र न येता गर्दी टाळत प्रेसक्लबच्या सर्व सदस्यांच्या वतिने निवेदन दिले आहे. या प्रसंगी जेष्ठ सल्लागार अरुण पवार, अनिल मोकाशी, सचीव गिरीश गोरेगांवकर, कार्याध्यक्ष पदमाकर उभारे, खजिनदार संतोष सुतार, एम न्युज चॅनलचे सुनिल राजभर हे सर्व पत्रकार कोरोना आचारसंहितेचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेऊन तोंडाला मास्क, रुमाल बांधून तहसिल कार्यालयात निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या