रायगड पोलिसांची एक कोटींंची दंड वसूली.!

अरुण पवार, प्रतिनीधी

माणगांव : दि ६ - रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी कोरोना संकट काळात महत्वपूर्ण कर्तव्य बजावले असून त्यांनी १५ तालुक्यातील ३५,९४५ वाहनचालकांवर कडक कारवाई करून तब्बल १ कोटी २४ हजार २०० रुपये दंड वसूल केले आहेत. त्यामुळे शासनाच्या अर्थिक अडचणीत या वसूलीने मोठी भर पडली आहे. 

राज्यात २२ मार्च पासून सर्वत्र टाळेबंदी सुरु झाली. तेव्हापासून वाहतूकीचे नियम आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश न पाळणे तसेच विनाकारण उगाचच बाहेर रस्त्यावर फिरणे, मास्क न लावणे, जमावबंदी मोडणे आदी नियमांचे भंग व उल्लंघन केल्याने हि धडक कारवाई करण्यात येत आहे. २२ मार्च ते ५ मे या ४३ दिवसात २ कोटी पेक्षा जास्त वसूली करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये विशेषतः दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली.

यापूर्वी देखील वाहतुकीचे नियम भंग करणार्यावर कारवाई सुरुच होती. त्या पोलिस कारवाईत दररोज रायगड जिल्ह्यातून २ ते ३ लाख रुपयांची दंडात्मक वसूली करीत होते. रायगड पोलीस कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पोलीस बंदोबस्त, अवैध वाहतूक, अवैध मद्यपान विक्री, कोरोना संकटग्रस्तांना सर्वोतोपरी मदत, दैनंदिन अहवाल सादर करणे, गर्दीला आळा घालणे, आदी जवळजवळ सर्व कामे रात्रंदिवस करीत आहेत. पोलिसांना कोरोना संरक्षक पोशाख मिळाले नसताना सुध्दा आपले कर्तव्य चोख बजाऊन शासनाच्या तिजोरीत दंड वसूली करीत मोलाची भर घालून मदतीचा हात देत आहेत.

                                      पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#raigadpolice#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या