प्रतिनिधी इंदापूर -
COVID19 (करोना) च्या पार्श्वभूमीवर सुट्टी आहेत. परंतु इंदापूर येथील आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयामध्ये नामवंत प्राध्यापक आहेत. यांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असून रोज एका तज्ज्ञ प्राध्यापकाचे वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान होत आहे. रोज सकाळी , दुपारी व सायंकाळी सोसिअल ग्रुप वर ते अपलोड केले जाते 53 वे पुष्प **प्रा. उर्मिला कापले* यांचे **introduction to machine learning* या विषयावर दि. 04 मे रोजी सकाळी 10. 00 वाजता व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करत आहेत. या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे विद्यार्थी आणि पालकांमधून कौतुक होत आहे.
✒प्रा.डॉ संजय चाकणे



0 टिप्पण्या