वैभव सत्वे, प्रतिनिधी
माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांची कार्यतत्परता
माणगांव: दी १८ -कोरोनामुळे मुंबईमध्ये अडकून पडलेली एक आई आपल्या ३ वर्षाच्या मुलीसह दि. १६ मे रोजी आपल्या पतीकडे माणगांव येथे राहत्या घरी आली असता, घर मालकांनी मात्र त्यांना घरात राहण्यास विरोध केला. तिच्या पतीने घर मालकांना पत्नी व मुलींनी डॉक्टरकडून रीतसर वैद्यकीय अहवाल घेतला असल्याचे सांगत, होम क्वारंटाईन करण्याची विनंती केली परंतु काही फायदा झाला नाही. नाईलाजास्तव त्यांना आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला घेत घराबाहेर रस्त्यावर थांबण्याची वेळ आली. अशा वेळी त्यांनी आपल्या परिचयाच्या एका व्यक्तीला सांगितले. त्यांनी नगरसेवक, नगरपंचायत कार्यालय, सबंधित कर्मचारी सगळ्यांना फोन केले परंतु कोणीही फोन उचलले नाहीत. शेवटी मग काहीतरी मार्ग निघावा याकरिता ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांना फोन केला. त्यांनी काही अर्धा तासाभरातच त्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावला.
माणगांव पत्रकार कुवेसकर यांना माहिती मिळताच त्यांनी लगेच नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांना फोन केला आणि माहिती दिली आणि स्वतः जागेवर जात नगराध्यक्षा यांच्या समवेत पाहणी करुन या अडचणीत सापडलेल्या कुटुंबाची चौकशी केली. संपूर्ण परिस्थिती समजून घर मालकाशी सविस्तर चर्चा केली परंतु ती व्यर्थ ठरली. त्यावेळी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी मग क्षणाचा देखील विलंब न करता माणगांव नगरपंचायती कडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची सुविधा केलेल्या ग्लोबल इन्स्टिट्यूट येथे सर्व प्रोटोकाॅल प्रमाणे त्यांची राहण्याची सोय केली आहे.
कोरोनाच्या भयाने अनेक जणांची मानसिकता बदलली असून माणुसकी हरवत चालली आहे. घरमालक मुंबईतून आलेल्या भाडोत्र्याला खोलीत येऊन देत नाही. सुशिक्षीत लोक देखिल विचार करत नाहीत. खेड्या पाड्यात मुंबई पुणे येथून गावाकडे आलेल्या भाऊ भावाला, आई बाप आपल्या लेकरांना आणि गाववाले चाकरमान्यांना घरात घेण्यास घाबरत आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यासाठी शासन स्तरावर कोरोनाचे भय दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची खरी गरज आहे. माणगांव नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांची कार्यतत्परता पत्रकार कुवेसकर यांनी फोनवर माहिती देताच त्यांनी लगेच जागेवर जाऊन या कुटुंबाची माहिती घेतली आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यावेळी या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला एका अडचणीत सापडलेल्या कुटुंबाची पुढे होणारी असुविधा थांबली आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या