गिरीश गोरेगावकर,प्रतिनिधी
गोरेगाव : दि १८ - गोरेगांवनजीक मौजे कुशेडे येथे १४ मे रोजी सापडलेल्या पहिल्या पाँझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी पाचजणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. यामध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यातील दोन महीला व पुरुष 30 ते 35 वयोगटातील आहेत. यामुळे गोरेगांव विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
आता गोरेगांव विभागातील रूग्णांची संख्या सहा झाली आहे.
१२ मे रोजी या सर्व व्यक्ती मुंबईतून कुशेडे येथे आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र १४ मे रोजी यातील एक तरुण पाँझिटिव्ह आल्याने प्रशासनाने या तरूणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने या पाचजणांना कोरोना लागण झाल्याचे तपासणी अंती सिध्द झाले. त्यांना उपचारासाठी कोविड रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
गेली पंधरा दिवसां पासून मुंबईकर चाकरमान्यांनी आपला मोर्चा गावा कडे मोठ्या प्रमाणात वळविला आहे. शेकडो लोक मिळेल त्या वाहनाला अधिकचे पैसे मोजून किंवा पर्यायी शेकडो किलोमीटर पायी चालत जाण्याचा पर्याय स्विकारुन आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या पाचजणांचे रिपोर्ट पाँँझिटिव्ह आल्याने आता कुशेडेसह गोरेगावकरांची झोप उडाली आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Goregaon#Maharashtranews


0 टिप्पण्या