रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी
माणगांव दि: ४ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. आता १७ मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरु राहणार आहे. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रायगड ऑरेंज झोन त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत असतानाच, माणगांवत बाजारपेठेत कोरोना कधी नव्हताच ? अशी गर्दी पुन्हा सुरु झाली आहे. जवळपास सर्वच व्यवहार सुरु झालेत. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाने दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली आहे. हे सर्व सशर्त आणि अटींवर चालू होणार आहे. पान गुटखा तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा आहे.
परप्रांतिय अशिक्षित लोकांमध्ये त्यांच्या राज्यातील गावी परत जाण्यासाठी अजुनही संभ्रम आहे. नेमकी परवानगी कशी मिळणार, ऑनलाईन अर्ज कसा भरावा? याबाबत मोठा गोंधळ आहे. हे लोक तहसिल कार्यालयाकडे धाव घेत आहेत. पुणे आणि मुंबईतून येणारीही बरीच माणसं द्विधा मनस्थितीत आहेत. कारण ईकडे आल्यानंतर क्वारंटाईन किती दिवस आणि कुठे राहायचय असा प्रश्न त्यांना पडला आहे. यातील वैद्यकिय दृष्ट्या तंदूरुस्त माणसांना होम क्वारंटाईन ठेवावे असे त्यांचे म्हणने आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबत मार्गदर्शक तत्वांची माहीती सूचना संबंधितांना देण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष घालावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. लाॅकडाऊन जणू काही संपला आहे. अशीच भावना निर्माण झाली असून लोक पून्हा आचारसंहिते कडे दुर्लक्ष करुन फिरु लागले आहेत. एकदम सर्व गोष्टी शिथील झाल्यास पुन्हा हलगर्जीपणा मुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती देखिल व्यक्त होत आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या