प्रतिनिधी - चिंचवड
कोरोना कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले 2 महिन्यापासून ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कर्तव्यसोबतच चिखली गावचे सुपुत्र सध्या #करमाळा_पोलीस_ठाणे जिल्हा सोलापूर ग्रामीण येथे नेमणुकीस असणारे #पोलीस_उपनिरीक्षक_प्रवीण_साने यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांचा 17 मे रोजी आर्वी तालुक्यातील जुन्नर येथील गाढवे परिवारातील कन्येशी विवाह पार पडला. भारत देशावर कोरोनाचे संकट असल्याने आणि जनसामान्यांची होत असलेली परवड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी लक्षात घेऊन लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 1 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला.
साहेब आपल्या कार्यास मनापासून सलाम 👍💐



0 टिप्पण्या