रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीचे भान हीच कोकणची ओळख
माणगांव : दि. १६ आपण आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतोच. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महसूल कर्मचारी संघटनेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शेकडो किलोमिटर जिवाच्या आकांताने प्रतिकुल परिस्थितीत महामार्गावरुन पायपीट करीत कोकणातील आपल्या गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना, त्यांची प्रत्यक्ष ते रस्त्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन आस्थेने विचारपूस चौकशी करुन प्रांत ऑफिसच्या सर्व कर्मचारी वृंदासोबत महसूल संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर मॅडम यांचे मार्गदर्शना नुसार काल दि. १५ / ०५ / २०२० रोजी मुंबईतून कोकणात पायी चालत जाणाऱ्या एकूण ४७ चाकरमान्यांना मदतीचा हात दिला आहे.
आपल्या शासनाच्या उपविभागांनी परप्रांतीयांना जरी सोयी सुविधा देऊन रवाना केले असले तरी, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने राकेश सावंत यांनी व माणगांव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार विलास वाघमारे तसेच कर्मचारी दिनेश पाचाडकर, नितीन नकाशे, अजित शेख, राजेश गंडाले, छाया तेटगुरे, सुजित परांजपे व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्याने कोकणात शेकडो किलोमिटर पायी चालत जाणाऱ्या आपल्या लोकांसाठी बिसलेरी पाणी बाॅटल व बिस्किटचे पुडे तसेच वाहतुकीसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्यांनी गांवी पायी चालत जाऊ नका ! ही विनंती करीत, कोकणातील त्यांच्या गावी मार्गस्थ करून सुखरूपपणे गांवी पोहचवीले. या प्रशंसनिय कार्याचे जनतेमधून तोंडभरुन कौतुक होत आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या