गिरीश गोरेगावकर,प्रतिनिधी

गोरेगाव : दि १५- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आयसोलेशन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. दक्षिण रायगडमध्ये पाली आणि पन्हळघर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ परिसरात अशा केंद्राची उभारणी करण्यात येत आहे . विद्यापीठ परिसरातील आयसोलेशन सेंटरची पाहणी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी आज केली .

यावेळी प्रांताधिकारी सौ प्रशाली दिघावकर , तहसीलदार सौ . प्रियंका आहिरे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काशिद , पोलीस निरीक्षक श्री टोम्पे , कुल गुरू डॉ शास्त्री , सार्व. बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री राऊत , डॉ . पोरे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे आदी उपस्थित होते .

तंत्र शास्त्र विद्यापीठ वसतीगृहाच्या नवीन इमारतीत हे सेंटर उभारण्यात येत असून या ठिकाणी सुमारे १५० ते १६० बेडची व्यवस्था आहे . याशिवाय ओपीडी , मेस , ऑाक्सिजन या सुविधा करण्यात येणार आहेत . जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत पण त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील अशा रुग्णांचे मॉनिटरिंग या सेंटरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देत , पालकमंत्री ना . अदिती तटकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या.

                           पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #mangaon#Maharashtranews