उपसरपंच श्री.अमोल जगताप
उपसरपंच पदी नियुक्ती झाल्यावर अमोल जगताप यांचा सत्कार करताना युवा मार्गदर्शक विक्रम शेवाळे
✍️पुणे प्रतिनिधी:-
प्रा.राजेंद्रकुमार शेळके.
शेवाळेवाडी येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणूकीमध्ये एकमताने श्री.अमोल विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली. शेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक विजयी सभासदांना उपसरपंच पदासाठी प्रत्येकी तीन तीन महिन्यांच्या कालावधी साठी ही नियुक्ती करण्यात आली होती.त्यातील अंतिम टप्प्यात आता शेवाळेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते शाखा अध्यक्ष असून युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. परिसरातील प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग असतो तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच प्राधान्य देतात. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि हवेली तालुक्याचे युवा नेतृत्व मार्गदर्शक मा. श्री. विक्रम जगन्नाथ शेवाळे यांनी यावेळी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शेवाळेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच, सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तन पॅनल चे प्रमुख उपस्थित होते.

0 टिप्पण्या