Breaking news : देशातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल - सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत.



पोलीस प्रवाह न्यूज स्पेशल रिपोर्ट

मुंबई : दि . 8 एप्रिल : देशभरात कोरोना  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काही यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत .

सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवावाच लागेल.कोरोन  प्रकरणात वाढ होत असताना सर्व भागांतून  14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही.  ‘यापुढे मोठ्या प्रमाणात वर्तणूक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडवून आणायला हवेत.’ कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या  बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या देशात कोविड – 19 रुग्णांची संख्या 5,194 वर पोहोचली आहे. या बैठकीत आरोग्य सचिव, गृहसचिव यांनी सद्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती सविस्तरपणे सांगितली. यापूर्वी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं जात आहे.
#Narendramodi #PMModi #Bjp #Coronavirus #Covid19 #Lockdown

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या