पत्रकार सेवा संघातर्फे आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप.



श्रीकांत नांदगावकर- वार्ताहार


तळा : दि . ८ - भारतात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे त्यामुळे दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालविणाऱ्या कष्टकरी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तळा तालुक्यात बहुतांश भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. लॉक डाऊनमुळे तीन महिने चालणारा काजू बियांचा सिजन वाया गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची ही अडचण लक्ष्यात घेऊन पत्रकार सेवा संघा तर्फे तालुक्यातील मेढे, मालाठे वाघवाडी, खांबवली, आंबेळी, गोसावी वाडी, शेणाटे, तारणे या आदिवासी वाड्यांवर अन्नधान्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, पो.नि.सुरेश गेंगजे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ राज्य अध्यक्ष आंबेगावे डी टी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, सरपंच मधुकर वारंगे, नीलेश निगुडकर, संतोष नांदगावकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या