माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या शुभहस्ते करमाळ्यात शिव भोजन योजनेचा शुभारंभ




करमाळ्यात शिव भोजन योजनेचा शुभारंभ : महाराष्ट्र शासन अंगीकृत शिवभोजन योजनेचा शुभारंभ माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आला .राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक आवाड यांनी शिवभोजन योजनेअंतर्गत केंद्र सुरू केले आहे . यावेळी श्रीदेविचामाळ यंथील संगोबा रोडवर तंबु टाकुन निवासास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील नागरीकांना शिवभोजन योजनेअंतर्गत फुड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले . यावेळी सामाजीक कार्यकर्ते गणेश करे- पाटील , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे,नगरसेवक प्रवीण जाधव, अतुल फंड, विनय ननवरे, संतोष कटारीया, अरूण जगताप, सुजीत बागल आदी यावेळी उपस्थित होते . भटक्या समाजातील शहराजवळ आश्रयास असलेल्या लोकांना शिव फुड पॅकेट्स रोजच्या रोज पोहोच करणार असल्याची माहिती आवाड यांनी दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या