परेश शिंदे. रायगड, प्रतिनिधी.
माणगांव : दि.९ - माणगांव तालुक्यात परराज्यातून आलेल्या कामगार/मजूर यांना आज माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निजामपूर - इंदापूर रस्ता निजामपुर - पाचाड रस्ता रुंदीकरण कामावरील कामगार व त्यांचे ३० कुटुंब यामध्ये त्यांची लहान लहान मुलेबाळही आहेत, या संकटाचे वेळी घरात अन्नधान्या वाचून कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने पोलीसांकडून त्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ व इतर स्वयंपाकास लागणाऱ्या उपयोगी साहित्य वस्तू चे वाटप करण्यात आले आहे. मानवता हाच खरा धर्म याचे दर्शन घडविणारे हे कार्य आहे.
कोरोना संकटात अडकलेल्या तसेच मोलमजुरी करुन आपला चरितार्थ भागविणारे हातावर पोट असणारे व्यक्तींना या संकटाची झळ पोचली असून या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिशय सावधगीरी बाळगत हे मदतकार्य सुरु आहे. त्यामुळेच नागरिकांनी गर्दी करु नये व काळजीही करु नये कारण आपले समाजसेवक आणि पोलीस हे काम तुमच्या आमच्या काळजी पोटीच करीत आहेत. हे वाटप माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास इंगवले व त्यांचे सहकारी यांनी कर्तव्यावर असताना केले आहे. माणगांव पोलीसांची जनतेसाठी ही कर्तव्यतत्परता पाहून माणगांवकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
फक्त माणगांवकरांनी सुज्ञ पणे प्रशासन आणि पोलीसांचे सुचनांचे पालन करावे. कोणतीही सक्ती पोलीस करीत नाहीत, मानवताधर्माचे पालन ते करीत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठीच ते काम करीत आहेत. कोणतेही कठोर पाऊल त्यांना उचलावे लागू नये यासाठी ते सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. आपल्या कुटुंबापासून चोवीसतास दूर राहून ते हे काम करीत आहेत. या बद्दल जनतेमधुन त्यांचे आभार व्यक्त होत आहेत. जराही विचलीत न होता माणसातला हा देवमाणूस आज आपल्यासाठी जीवाची बाजी लावतोय या साठीच नागरिकांनीही सहकार्य करावे अशी भावना पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केली आहे.
गर्दी टाळा, गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका. सोशल डिस्टनसिंग सुरक्षित अंतर पाळा, शासनांचे नियमांचे काटेकोर पालन करा. चिंता करु नका, काळजी घ्या, लाॅकडाऊन कालावधीत आपल्या सगळ्यांकडून पोलीसांना हीच अपेक्षा आहे.
*मानवाता हाच खरा धर्म, पोलीसांचे स्तुत्य मदतकार्य*
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigadpolice#maharashtrapolice

0 टिप्पण्या