प्रतिनिधी चिंचवड
दिनांक ११ मार्च ते९ एप्रील 2020 रोजी पर्यंत "अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड च्या आपत्ती व्यवस्थापन कक्षा मार्फत चोवीस तास हेल्पलाईन व्दारे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येऊन कंटोल रूम मार्फत प्राप्त तक्रारी वरुन एकुन ३३९५ लाभार्थींना जिवनावश्यक वस्तू व फुड पॅकेटचे (तांदूळ १० किलो.आटा १०किलो.मुगडाळ व तुरडाळ ५ किलो.साखर २ किलो.तेल १लिटर .मीठ १ किलो. कांदा मसाले ,इत्यादी) वाटप करण्यात आले.तसेच पिंपरी चिंचवड मधील एकुन ३० गावांमध्ये बेघर पर राज्यातील विस्थापित मजुर व गोरगरीब कुंटुबांना तापुरता निवारा क्रेद्र अन्नछत्र व अकरा क्षेञीय कार्यालय मार्फत नाश्ता जेवण निवारा व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे .
तहसिल कार्यालय मधील तहसिलदार , अधिकारी ,कर्मचारी तलाठी व मंडलअधिकारी यांनी एकदिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी तसेच एकच दिवसाचा पगारातुन अन्नधान्य व फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले . अपर तहसिल कार्यालय मध्ये पंधरा सामाजिक संस्थाचे सहकार्य करण्यात आले .
गिता गायकवाड (तहसिदार) यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अंकुश आटोळे , भावना पवार, भीमाशंकर बनसोडे,अनिल घोडके, मंडलअधिकारी गणेश सोमवंशी ,जयश्री कवडे व तलाठी आतुल गिते,शांता बाणखिले, मारुती पवार, अर्चना रोकडे,रश्मी गालपिल्ले,अजय चडचणकर,रुपाली परिहार ,स्वप्नील पटांगे,संदीप शिंदे यांनी परिश्रम केले अशी माहिती मंडल अधिकारी चिंचवड गणेश सोमवंशी यांनी दिली





0 टिप्पण्या