माणगाव : दि १० -- शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या आदेशानुसार माणगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच शेकाप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याना विनम्र आवाहन करण्यात आले होते. कोव्हीड १९ विषाणुंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व शासन स सर्वतोपरी सहकार्य करा.
कोरूना या संसर्गजन्य विषाणू ने सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. जगभरात नागरिक हतबल झाले आहेत या विषयाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना सतत योग्य व मोलाचे मार्गदर्शन करीत आहे. तसेच कोरोना हद्दपार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी राज्य शासनाचे सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
या सर्वांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. व त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे सर्व देवदूत स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता रात्रंदिवस आपल्यासाठी कठोर मेहनत करत आहेत.खरोखरचे गरजू आहेत त्यांना आपापल्या पद्धतीने आपण मदत करून या देशाचे नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडू.
याच आदेशाने पालन करून व सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी कामगार पक्षाचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या तर्फे खरवली आदीवासीवाङी व ऊमरोली बौद्ध वाङी या ठिकाणी ६५ घरांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप दि. ९ एप्रिल रोजी करण्यात आले. ह्या जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करताना सोशल डिस्टंशिंग व प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले गेले.यावेळेस माणगाव पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. सुर्वे, तलाठी अमित ऊजगरे, दिपक मोरे तसेच माजी ऊपसरपंच विद्यमान सदस्य नथुराम आडीत, विलास मोरे, मधुकर अर्बन ऊपस्थीत होते.
कोरोना संकटात अडकलेल्या तसेच मोलमजुरी करुन आपला चरितार्थ भागविणारे हातावर पोट असणारे व्यक्तींना या संकटाची झळ पोचली असून या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिशय सावधगीरी बाळगत हे मदतकार्य सुरु आहे. त्यामुळेच नागरिकांनी गर्दी करु नये व काळजीही करु नये कारण आपले समाजसेवक आणि पोलीस हे काम तुमच्या आमच्या काळजी पोटीच करीत आहेत. गर्दी टाळा, गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका. सोशल डिस्टनसिंग सुरक्षित अंतर पाळा, शासनांचे नियमांचे काटेकोर पालन करा. चिंता करु नका, काळजी घ्या, लाॅकडाऊन कालावधीत आपल्या सगळ्यांकडून पोलीसांना हीच अपेक्षा आहे. असा संदेश या निमित्ताने माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी दिला.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews



0 टिप्पण्या