निरंजन कळस,प्रतिनीधी
इंदापूर : दि २७-कोरोना विषाणुचा संसर्ग वाढु नये यासाठी प्रशासनाचे वतीने शासकीय दवाखान्यामध्ये विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी लहान मोठया आजारांसाठी ग्रामिण जनतेला स्थानिक खाजगी दवाखान्यामध्ये जावे लागत असुन इंदापुर विभागामध्ये वैदयकीय व्यवसाय करणारे डॉ.अमित मेहता स्वताची व रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेत उपचार करतांना दिसत आहेत.
कोणत्याही प्रकारच्या आजाराची विशेषता कोरोना विषाणु पासुन स्वताची व रुग्णांची सुरक्षा व्हावी यासाठी विशेष उपाय योजना व सुरक्षीत एन 95 मास्क, सर्जीकल मास्क,ग्लोज यासह आधुनीक उपकरणे वापरत आपला वैदयकीय व्यवसाय व सेवा जपत आहेत.
डॉ.अमित मेहता यांचे वडिल पी.आर.मेहताएम .बी.बी.एस. डी.जी.ओ.यांनी 52 वर्ष इंदापुरमध्ये वैदयकीय क्षेत्रात कारकीर्द जपली असून डॉ.अमित मेहता यांचे थोरले बंधु डॉ. अजय मेहता एम.बी.बी.एस.,एफ.सी.पी.एस. हे 24 वर्ष माणगांव मध्ये वैदयकीय क्षेत्रात कार्यरत असुन डॉ.अमित मेहता बी.ए.एम.एस हे इंदापुरमध्ये 17 वर्ष आपली वैदयकीय कारकीर्द सांभाळत आहेत.
सकाळी 9.30 ते 1.00 यावेळेस रुग्ण तपासत असुन अत्यावश्यक वेळीस रुग्ण साठी तत्पर हजर असतात. अताच्या परस्थिती दरम्यान सध्या खोकला व ताप एकत्र असा कोणत्याही रुग्णांस वाटल्यास सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याच डॉक्टर मेहता यांनी सांगितले.
तसेच इतर वेळी नेहमीप्रमाणे संपुर्ण सुरक्षेची काळजी घेत रुग्णांना तपासतात. व्यवसायापेक्षा रुग्णसेवा प्रथम लक्षात ठेउन डॉ.मेहता आपले वडिल व थोरले बंधु यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन वैदयकीय क्षेत्रात काम करतांना दिसतात. यासमवेत रुग्णसेविका प्रतिक्षा शिंदे व निलम जाधव या देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णसेवा देत आहेत. इंदापुर विभागामध्ये सर्वच डॉक्टर व मेडिकल/औषधे क्षेत्रातील देवदुत आत्ताच्या या कठीण प्रसंगी रुग्णसेवेचे अत्यंत महत्वाचे काम जबाबदारीने करतांना दिसत असुन नागरीकांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews



0 टिप्पण्या