प्रतिनिधी - गणेश कडू, लोणावळा
रायवूड गणेश मंडळ, तरुण मराठा मंडळ गावठाण, रोहिदास मित्र मंडळ ( रोहिदास वाडा ), सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गवळीवाडा , शेतकरी भजनी मंडळ वलवण तसेच सहकारी मंडळ व अष्टविनायक मंडळ
लोणावळ्यात बरेच सामाजिक संस्था दुपारी व रात्रीच्या जेवणाचे वाटप करीत आहेत पण सकाळच्या नाश्त्याची कमतरता गणपती मंडळांना जाणवली
त्यातून गणपती मंडळानीे नाश्ता वाटपाची सुरुवात केली हा नाश्ता सोशल डिस्टन सिंग चे नियम पाळून बनवला व वाटला जातो
पोलीस स्टेशन, नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग, स्वच्छता कर्मचारी व लॉक डाऊन मध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर व गोरगरीब लोकांच्या झोपडीपर्यंत पोहोचवला जातो हा उपक्रम तीन मेपर्यंत चालू राहणार आहे
काही सामाजिक संस्था खंडाळा घाट व आजूबाजूच्या परिसरात जाऊन भटक्या प्राण्यांचे खाण्या-पिण्याची सोय करीत आहेत या सर्व सामाजिक उपक्रमाचे प्रत्येक स्थरातून कौतुक होत आहे




0 टिप्पण्या