गिरीश गोरेगावकर,प्रतिनिधी

माणगाव : दि २७-माणगाव तालुक्यामधे दुबार भातशेती कापणीला आली असून दुबार भात पीक घेणारे शेतकऱ्यांची भात कापण्याची लगबग सुरू होणार आहे .माणगाव तालुक्यात कालव्याचे मिळणारे पाणी यामुळे येथील शेतकरी दुबार भातशेती करीतात.माणगाव तालुक्यात बऱ्याच गावात कालवे पोहचले असून त्याचा लाभ घेतांना शेतकरी दिसत आहेत.

         माणगाव मधे एकून  3100 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले असून यात  जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत- ५, गुजरात ११ इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये केली आहे.  साधारणतः ही लागवड  जानेवारी महिन्यांत केली असून सद्या भात शेती कापणी आला असुन काही दिवसातच कापणी चालू आहे.

       तालुक्यात या हंगामातील भात कापणीला आला असुन पाच दिवसांत कापणी सुरू  होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन येते. माणगाव तालुक्यांतील तालुका क्रुषी अधिकारी श्री.पी.बी. नवले यांनी यावेळी दुबार भात शेती करणारे  मौजे भादाव  येथील शेतकरी  रमेश डवले , प्रकाश भादवकर , शरद भादवकर  यांच्याकडे भेट दिली. तसेच त्यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

                         पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews