रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी
माणगाव : दि १६ -कोरोना (COVID-19) रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी माणगांवकरांचे सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीकोनातून काही जनहितार्थ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी माणगांव नगरपंचायतीच्या वतिने जाहीर आवाहन करण्यात येत असून सद्या मुंबई, पुणे व इतर शहरांमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, काही नागरीक इतर शहरांकडून शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊनचे आदेश मोडून आपल्या परिसरात, शहर, गांव, वाडी-वस्ती, घरात व कॉम्प्लेक्स मध्ये कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता येऊन राहण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे प्रत्येकाने सतर्क जागरुक राहून अशा व्यक्तींची माहीती दिल्यास त्या व्यक्तींला उपचारासाठी सुरक्षित ठेवले जाईल व योग्यती खबरदारी घेतली जाईल, घाबरुन जाण्याचे कारण नाही. काळजी घेतल्यास कोरोना रुग्ण पूर्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत आहोत.
फक्त या रोगाचा संसर्ग एका पासून दूसऱ्या व्यक्तीला झपाट्याने होत असतो, त्यामुळे या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आपण ही बाब दुर्लक्षित करु नये. तसेच सर्दी, कोरडा खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास नेहमीच्या डाॅक्टरकडे न जाता सरकारी रुग्णालयातच तपासणी साठी जाण्याची खबरदारी घ्यावी. बाहेर गावाहून आलेली यापैकी एखादी व्यक्ती जरी चुकून कोरोना बाधीत असल्यास गावात संसर्ग होऊन सर्वांच्या जिवाला धोका होईल, हाहाकार माजेल.
तरी अशी कोणतीही व्यक्ती अथवा संशयीत आढळून आल्यास ताबडतोब माणगांव नगरपंचायतीस अथवा आपल्या प्रभागाचे आपले नगरसेवक, नगरसेविका यांना त्वरीत संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नांव गोपनीय ठेवले जाईल. अशी माहीती देऊन आपण स्वतःच्या व गावाच्या भल्यासाठीच कार्य करीत आहात, तरी या कठीण परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेत कोरोना विरूद्धची ही लढाई जिंकण्यासाठी नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे विनम्र कळकळीचे आवाहन आरोग्य सभापती रत्नाकर उभारे यांनी केले आहे.
याबाबतची गोपनीय माहीती देण्यासाठी आपल्या वार्डातील १] नगराध्यक्षा - योगिता चव्हाण, वार्ड नंबर १५ मो.नं. ९२६०६००२६३, २] उपनगराध्यक्ष - दिलीप जाधव, वार्ड नं. २ मो.नं. ९७६६२६४५६५, ३] आरोग्य सभापती - रत्नाकर बा. उभारे, वार्ड नं. ११ मो.नं. ९४२२३३६७७१, ४] पाणीपूरवठा सभापती - जयंत बोडेरे, वार्ड नं. ४ मो.नं. ९९२३३३२८३७, ५] सभापती दिवाबत्ती शिक्षण - हर्षदा सोंडकर, वार्ड नं.५ मो.नं. ७०३०१४२६४४, ६] सभापती महिला व बालकल्याण - माधुरी मोरे, वार्ड नं. १६ मो.नं. ७८८७३०७६८६, ७] उपसभापती महिला व बालकल्याण - सानिया शेट, वार्ड नं. ६ मो.नं. ७७०९९९९२८६, ८] सदस्य - रिया उभारे, वार्ड नं. १ मो.नं. ७७५६०३६७७१, ९] सदस्य - भाग्यश्री यादव, वार्ड नं. ३ मो.नं. ७५०७७२२२५७, १०] सदस्य - आनंद यादव, वार्ड नं. ७ मो.नं. ९४२२४९४०२२, ११] सदस्य - नितीन वाढवळ, वार्ड नं. ८ मो.नं. ८८८८३४२४४४, १२] सदस्य - सचिन बोंबले, वार्ड नं. ९ मो.नं. ९६५७३८१५०९, १३] सदस्य - संदिप खरंगटे, वार्ड नं. १० मो.नं. ९४२३३८२८८५, १४] सदस्य - स्नेहा दसवते, वार्ड नं. १२ मो.नं. ८००७१९०६६३, १५] सदस्य - शुभांगी जाधव, वार्ड नं. १३ मो.नं. ९२०९१८०१८० / ९६९६८६८०८०, १६] सदस्या - अंजली पवार, वार्ड नं.१४ मो.नं. ८९८३१२४९१२, १७] सदस्या - निलम मेहता, वार्ड नं. १७ मो.नं. ८०८७९०२०६८, १८] स्विकृत सदस्य - हेमंत शेट, वार्ड नं. ११ मो.नं. ९४२१९००२००, १९] स्विकृत सदस्य - नितीन बामगुडे, वार्ड नं. ८ मो.नं. ९४२१९००६०० यांचेशी त्वरीत संपर्क साधावा अशी माहीती त्यांनी दिली आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#raigad#Mangaon#Maharashtranews


0 टिप्पण्या