माणगांवातील शेतकरी मात्र हवालदिल; कोरोनाचे संकट शेतीवर.!


वैभव सत्वे, प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सुमारे ८०% लोक शेती करतात. तसेच अनेक कुटुंबाच उदरनिर्वाह शेतीवरतीच अवलंबून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने भेंडी, टोमॅटो, मिरची, भोपळा, कारली, पालेभाज्या यांची पीक घेतली जातात. ही सर्व पिके घाऊक विकण्यासाठी मुंबई व पुणे आणि जवळच्या बाजारपेठेत नेली जातात.

  सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशासह संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अनेक भाजी मंडई बंद आहेत. दळणवळण ही बंद ठेवण्यात आले आहे. याचा सर्वात मोठा फटका व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. या देशाच्या पोशिंद्यावर सध्या हलाखीचे दिवस आले आहेत असेच म्हणावे लागेल.

  माणगांव तालुक्यातील खांदाड  येथील विठोबा सीताराम पालकर व गजानन नारायण पोवार हे गेली अनेक वर्षे शेती करून भाजीपाल्याच पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करतात.

मात्र दरवर्षी यातून ते ३ लाख रुपये पर्यंत चे उत्पन्न घेतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी ३ एकर शेतात भाजीपाला केलेला आहे. आपार मेहेनत घेऊन पीक सुद्धा चांगले आले आहे.

 परंतु कोरोना विषाणूमुळे सर्वत्र बंदी असल्याने त्यांच्या ३ एकर शेतातील कार्ली व मिरचीच पीक ही उभ्या झाडांवरच शेतातच पिकून वाया गेलेली दिसत आहे. चांगले आलेले  पीक बाजारपेठ बंद असल्यामुळे विकायला काढता येत नाही. हाती आलेला घास कोरोना नावाच्या संकटाने गिळून टाकला.

शेतीवर केलेला खर्च ही आता निघू शकत नाही. आता सध्या त्याच्याकडे पिकाला पाणी घालायला डिझेलचे पैसे सुद्धा सुटत नाहीत. अशी परस्थिती  तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेलेली आहेत.  याकडे प्रशासनाने  लक्ष देऊन त्यांची नुकसान भरपाई तरी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे लक्ष दिले नाहीतर जगाला पोसणाऱ्या पोशिंद्यावरच उपासमारीची वेळ येणार आहे.

                       पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या