*नैसर्गिक आपत्ती, दुष्काळाने ग्रासलेला बळीराजा कोरोना संकटाने प्रचंड धास्तावला..

रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी

कोरोना संकटात चिंताग्रस्थ शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सहकार्य करणार - निलेश कुंडलिक थोरे.


 माणगाव : दि १६ - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना (COVID-19) व्हायरस च्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात आधी १५ एप्रिल पर्यंत आणि आता आणखी  ३ मे पर्यंत संचारबंदी लागू झालेली आहे. लाॅकडाऊन मुळे दळणवळण व इतर संसाधने जवळजवळ पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा प्रचंड मेहनतीने, काबाडकष्टाने जिवाचे रान करुन प्रसंगी याच्या त्याच्या कडे काढ-ओढ करुन शेतीत गुंतवणुक करुन तयार झालेला माल खरेदी करण्यास ग्राहक नसल्याने शेतावरच पडून आहे. जगाचा पोशिंदा बळीराज्यावर आज उपासमारीचे संकट आले आहे.

तरी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्या कुणाचा शेतीमाल विक्रीसाठी तयार झालेला असून ग्राहक नसल्यामुळे शेतावर पडून राहीला आहे व विक्री होत नसेल. अश्या शेतकऱ्यांनी माणगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ. मर्यादित चे विद्यमान सभापती निलेश कुंडलिक थोरे यांच्याशी निसंकोचपणे मोबाईल नंबर  ७७०९६५०५०३ / ८२६०४८४८४८ यांवर संपर्क करा असे विनम्र आवाहन निलेश थोरे यांनी केले आहे.

आपला शेतमाल विक्री करण्याच्या दृष्टीने आपल्याला योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. कोरोना संकट समयी निलेश थोरे सारखे तरुण व्यक्तिमत्व निरपेक्षपणे प्रसिद्धी पासून दूर राहत, गेल्या पंधरावड्या पासून जनजागृती करत शासन सुचनांचे पालन करुन, गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन अव्याहतपणे मदतकार्य, जनसेवा करीत आहेत या बद्दल तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
                       पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या