वैभव सत्वे, प्रतिनीधी
माणगांव : दि २४ -कोरोना साथीमुळे गत एक महिन्यापासून लॉक डाउन सुरू आहे. त्यामुळे घराबाहेरील सर्व व्यवहार ठप्प झाले असून आबालवृद्धांची मोठी गैरसोय होऊन घराबाहेरील कोणतीच कामे वा मनोरंजनात्मक बाबी करता येत नाही.लहान मुलांचे खेळ,सायकल चालविणे ,फिरणे आदी बाबी बंद असल्याने घरच्या घरी होणाऱ्या मनोरंजनासाठी घरोघरी विविध पारंपारिक खेळांना पसंती दिली जाते आहे.
समाजमाध्यमांचा प्रसार होण्यापूर्वी घरोघरी बुद्धिबळ ,सापसीडी, काचा मण्यांचे खेळ,पट ,कॅरम ,सारीपाट इत्यादी अनेक खेळ घरोघरी मोठया आवडीने खेळले जात असत.दूरदर्शन वाहिन्यांचे जाळे पसरले व समाज माध्यमांचा प्रसार वाढल्यानंतर घरोघरी खेळल्या जाणारे पारंपारिक खेळ अडगळीत गेले होते.यातील अनेक खेळ तर नवीन पिढीला माहीतही नव्हते.
लॉकडावून काळात घरातील वरिष्ठ मंडळींना मोकळा वेळ व सर्व कुटुंब घरीच असल्याने अनेकांना या पारंपारिक खेळांची आठवण झाली असून हे खेळ खेळण्याकडे अनेक घरातून आबालवृद्ध व्यस्त असलेले व लॉक डाउन सुसहय करण्याकडे वळले आहेत.यामुळे कौटुंबिक जिव्हाळा व नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत. यातून नवीन पिढीला पारंपारीक खेळांची माहिती होत असून सतत टीव्ही वर व समाजमाध्यमांवर व्यस्त असणाऱ्या नवपिढीला मनोरंजनाची वेगवेगळी साधने माहिती होत आहेत.काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला पारंपारिक खेळांचा वारसा कोरोनामुळे पुनः जागृत होत आहे.
या सर्व खेळांमुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येउन खेळण्याचा व निखळ आनंदाचा अनुभव घेत असून कुटुंब व्यवस्था घट्ट होऊन नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याची भावना समाज अभ्यासक व मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या