संतोष सुतार,प्रतिनीधी
माणगाव : दि २४ - कोरोनाच्या साथीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉक डाउन मुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील पनवेल व खारघर या शहरी भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यानी अभिनव कल्पना साकारली असून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना घरपोच दिला जाणार आहे.यामध्ये एकूण 20 विविध प्रकारच्या पालेभाज्या अतिशय स्वस्त दरात 350 रुपयात ग्राहकांना मिळणार आहेत. लॉक डाऊनमुळे शेतकरी व ग्राहक थेट विक्रीचा हा उपक्रम शेतकऱ्यांना व ग्राहकांना अत्यन्त उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना मिळत आहे.
या किटमध्ये 20 भाज्या आहेत.यामध्ये -काकडी 1 किलो ,शिमला 1 किलो ,टोम्याटो 1 किलो ,भेंडी 500 ग्रॅम,हिरवी मिर्ची 250 ग्रॅम,दोडका 500 ग्रॅम वांगे 500 ग्रॅम ,कोथंबीर 2 जुडी ,आले 250 ग्रॅम ,बटाटा 1 किलो ,फ्लावर 1 नग,कोबी 2 नग,गाजर 500 ग्रॅम,शेवगा 500 ग्रॅम,कार्ले 500 ग्रॅम ,गवार 250 ग्रॅम ,कांदे 1.5 किलो ,लिंबू 10 नग ,कलिंगड 1 नग ,खरबूज 1 नग आहेत.
खास सोसायटीच्या पूर्व नोंदणीने सदर भाजीपाला किट पोहोचते केले जात आहे. शेतकरी आज वाईट परिस्तिथी मधून जातोय. या भावनेनुसार फक्त 350/- रुपयात ग्राहकांच्या दारात सेवा देत आहोत.सर्व सोसायटी मिळून बुकिंग झाल्यास सेवा देण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत.या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे वैभव ढवळे यांनी बोलताना सांगितले.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या