वैभव सत्वे- प्रतिनिधी
माणगाव : दि. ९ -- संचारबंदीत शासनाच्या आदेशाचा अनेक ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे. त्यातीलच हा एक प्रकार
माणगाव तालुक्यातील मौजे बामाणगाव येथील विश्वकर्मा मंदिरासमोरील आत्माराम जयराम विनेरकर यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दिनांक ८ एप्रील २०२० रोजी सायंकाळी ४:४० वाजता विनापरवाना जुगार खेळताना, प्रत्येकाचे हातात तीनपत्ता घेऊन भारतीय चलनातील पैसे लावून, जुगार खेळतानाचे स्थितीत आढळून आल्याने, दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत रविवार देि. ८ एप्रिल २०२० रोजी रात्री ९.४२ वा . या गुन्ह्याची फिर्याद माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल /१९५१ गोविंद भानुदास तलवारे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या गून्ह्यामागील दहा आरोपींची नावे १) प्रकाश सहदेव सुतार - वय ४८, २) सतीश आत्माराम विनेरकर - वय २९, ३) सिद्धेश अशोक भालेकर वय - २९ , ४) प्रफुल्ल वसंत सुतार वय - ३१, ५) नवनाथ एकनाथ सुतार -वय २८, ६) जितेंद्र शंकर सुतार वय - ३२, ७) उमेश गजानन सुतार वय - ४५, ८) राजाराम विठ्ठल सुतार वय ५०, ९)सुरज वासुदेव सुतार वय २९, १०) किरण वसंत सुतार वय ३१ सर्व राहणार बामणगाव ता. माणगांव या प्रत्येका जवळील वापरात असलेले किंमती मोबाईल सिमकार्ड सह व त्यांची अंग झडती घेतली असता प्रत्येका जवळ मिळून आलेल्या भारतीय चलनातील नोटा अशा स्वरुपात मोबाईलची किंमत्त रुपये व जप्त केलेली रोख रक्कम एकुण रुपये ५८,८९०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना बेकायदेशीर तीनपत्ते त्यावर पैसे लावून जुगार खेळणे व कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जारी केलेल्या आदेशाची अवमान्यता करून कोरोना आजार पसरवायची घातक कृत्ये केल्या प्रकरणी सदर आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ६७/२०२० महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ) भा. द. वि. कलम १८८, २६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.करे हे करीत आहेत.
पोलीस प्रवाह न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ.

0 टिप्पण्या