सासर्‍याच्या अंत्यविधीला पोहचण्यासाठी सुनेची पायपीट ; ६ महिन्याच्या लेकीला घेऊन गाठले 130 किमी अंतर

श्रीकांत बिरवाडकर, प्रतिनिधी
म्हसळा : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार घातला असून महाराष्ट्र राज्य देखील याच्या विळख्यातून वाचू शकला नाही. कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले असून संचारबंदी देखील करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एसटी बस सह खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतुक बंद असल्यामुळे सासर्‍याच्या अंतविधिला पोहचण्यासाठी सुनेने आपल्या सहा महिन्याच्या लेकीला घेऊन पनवेल ते म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावापर्यंत अंतर पायी चालत पार केले.

         तालुक्यातील मेंदडी गावचे पांडुरंग गोविंद पाटील यांचे दिनांक 4 एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील यांच्या निधंनाच्या वृत्ताने कुटुंबात सर्वत्र दु:ख पसरले होते. मात्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबातील अनेकांना येता आले नाही. अशातच पाटील यांची सून पार्वती हेमंत पाटील या सासर्‍यांच्या अंत्यदर्शनासाठी सरसावली असताना त्यांनी सासर्‍याच्या अंत्यदर्शनासाठी आपल्या सहा महिन्याचा लेकीला घेऊन थेट पनवेल ते मेंदडी अंतर गाठण्याचा निश्चय केला.

     यावेळी त्यांच्या सोबत पायी चालताना ईश्वरी हेमंत पाटील-नात (वय 4 वर्षे,) संचित हेमंत पाटील-नातू (वय 5 वर्षे), सिद्ध कृष्णा पायकोळी-नातू (वय-6 वर्षे) रमा देवनाथ वेटकोली-मेव्हणी हे देखील होते. पायी निघालेल्या या सर्वांनी वाहन मिळाले तर वाहनाने नाहीतर पायी पनवेल ते मेंदडी असा 130 किलो मीटरचे अंतर पार केला. मात्र कोणाचीही वाट न पाहता पांडुरंग गोविंद पाटील यांचे शासनाच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.यामुळे त्यांची सून पार्वती हेमंत पाटील यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. मात्र सासर्‍याच्या अंतिम दर्शनासाठी कसलीही पर्वा न करता पायपिट करून गावी येणार्‍या सुनेचा आपल्या सासर्‍याबद्दल आदर व प्रेम पाहून संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या मुखातून धन्य ती लेक (सून)... असे गौरव उदगार येत आहेत.
                 
                       पोलीस प्रवाह न्यूज.
#mangaon#raigad #Panvel #Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या