*घेणार मी श्वास आता*- ✍️ कवी.राजेंद्रकुमार शेळके



प्रतिनिधी नारायणगाव  -

*घेणार मी श्वास आता*
--------–-–----------
आज जीवनाचा सूर  काही सापडेना
वेदनांना भार माझ्या काही पेलवेना
वेदनेची काळरात्र आता अंतरी बोचते,
कोरोनाचे संकट साऱ्या जगावरी टांगते.
बंदिवान जग सारे अंतरी शोधतो
कोंडलेल्या जिवास दुःख सांगतो
जगी सर्वत्र वाटे आता व्यर्थ सारे,
 डोळ्यांतील आसवांनो जरा मुक्त व्हारे.
मोकळा श्वास घेण्या मन शोधून दमले,
काळजी घ्या घरीच रहा कोरोना सांगून गेले .
💐💐💐💐💐💐💐💐

✍️ कवी.राजेंद्रकुमार शेळके.
  नारायणगाव,जि.पुणे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या