जळगाव प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी
।। कोरोना विषाणु च्या महामारीमुळे सर्वत्र लॉक डाउन सुरु असतांना फ़क़्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात आलेली आहे मात्र जिल्हाधिकार्यांच्ये कुठलेही आदेश नसताना विनाकारन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्शाचालकांवर जळगांव शहर वाहतूक शाखेने कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे मात्र या दोन दिवसात 100 पेक्षा जास्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ।मात्र सध्या लॉक डाउन च्या काळात प्रवासी रिक्षात प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असतांना ही आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण प्रवासी वाहतूक करून गर्दी होण्यास कारणी भूत ठरत असणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलीस अधीक्षक डॉ पंजाब राव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दहा जणांचे फिरते पथकाची नेमणूक करून त्यांच्या सह शहरातील विविध भागात जाऊन विनाकारण प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा वर कारवाई केली आहे. त्यामुळे विनाकारण प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर चपराक बसली आहे . त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या कारवाई मुळे कोरोना विषाणू पसरण्यास आळा बसेल असे मत जनमानसात बोलले जात असून वाहतूक पोलीसांच्या या कारवाई चे ही कौतुक केले जात आहेत ।।



0 टिप्पण्या