कोरोना बंदोबस्तातही पोलीसांची धडक मोहीम हातभट्टीचे अड्डे केले उद्ध्वस्त ; गुळ मिश्रित रसायन जागीच नाश.!


वैभव सत्वे, प्रतिनिधी

  माणगाव : दि २१- माणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १८ व २१ एप्रिल असे दोन दिवसात साई, विहुले, होडगांव, सुर्ले, नाणोरे आदिवासी वाडी, उत्तेखोल आदिवासी वाडी आणि खांदाड आदिवासी वाडी या गावांतून माणगांवचे कर्तव्यतत्पर डिवायएसपी शशिकांत काशिद यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वात सपोनि. उध्दव सुर्वे, सफौ. जितेंद्र वाटवे, पोहवा. स्वप्निल कदम, रविंद्र म्हात्रे, सौ. सुनिता सानप, सौ. दया पाटील, पोना. सुनिल शिरसाठ, पोशि. विनायक चांदूरकर, शाम शिंदे, राम डोईफोडे आणि श्रेयश म्हात्रे यांनी गावठी हातभट्टी दारुचे अड्डयावर धाड टाकून तेथे मिळून आलेले गुळ मिश्रित रसायन जागीच नाश करण्यात आले. या कारवाईत अंदाजे २५,०००/- रुपयांचे गुळ मिश्रित रसायन जागीच नाश करण्यात
आले आहे.
                   
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. सर्व प्रकारची देशी, विदेशी दारु दुकाने व बिअर बार बंद असल्याने आणि मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई व उपनगरातून इकडे आले आहेत. त्यामुळे गावठी हातभट्टी दारुचे अड्डे विविध गावांत चालू असल्याचे माहितीवरुन काही ठिकाणी तेथिल स्थानिक पोलीस पाटील यांचे मदतीने वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाड टाकून, सध्या कोरोना बंदोबस्त ड्युटीमध्ये व्यस्त असताना सुध्दा धडक कारवाई केली आहे. पुढेही अशीच कारवाई चालू राहील. असे पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाववाल्यांनी निर्धार केल्यास अवैध दारुला आळा घालणे शक्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पोलीसांवर कामाचा ताण वाढत आहे; सकाळी संचारबंदीतही विनाकारण फेरफटका मारणाऱ्या बेफिकीर दूचाकी व गाडी चालकांवर धडक मोहीम व आता दूर्गम भागात प्रत्यक्ष झाडाझूडपात जागेवर जाऊन हातभट्टी दारु उद्ध्वस्त केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक कायद्याचे काटेकोरपालन करण्यासाठी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्या प्रमाणे जनहितार्थ सेवा करण्यासाठी आपले पोलीसदल सदैव कटीबद्ध आहे. जनतेने शासन सूचनांचे पालन करणे पोलीसांना अपेक्षित आहे. लोकांनी अत्यंत महत्वाचे जरुरीचे काम असल्यासच बाहेर पडावे अन्यथा चुकीचे वर्तन केल्यास, आपल्याच संरक्षणासाठी पोलीसांना कठोर कारवाई करणे भाग पडत आहे. त्यांना सहकार्य करणे हे आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे. अशी भावना पोलीसांनी या निमीत्ताने व्यक्त केली आहे.
         
                              पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#raigad#MangaonPolice#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या