तरुणांनी सतर्क राहून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्नांची गरज : जाणकारांचे मत

तरुणांनी सतर्क राहून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्नांची गरज : जाणकारांचे मत

कोरोनाने भारतात कोटीच्या घरात लोक मृत्युमुखी पडतील अशी भिती व्यक्त होत आहे.

उतेखोल/माणगांव - ( रविंद्र कुवेसकर )

देशप्रेमींनो सावधान, तरुणांना घरात राहूनच क्रांती करण्याची संधी आली आहे, मी बाहेर पडणार नाही, तुम्हीही बाहेर पडू नका, गर्दी करु नका साठी जनजागृती करा. सोशल मिडिया सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान, शक्ती तुमच्या हाती आहे. त्याचा वापर करताना शासनाला सहकार्य करा. आपल्या गावात, शहरात, वसाहती, गल्ली बोळातून, नाक्या नाक्यावर करडीनजर ठेऊन सतर्क रहा. देशाला तूमची गरज आहे, हे काम तूम्हीच करु शकता. देशप्रेम, देशभक्ती सांभाळण्याची हीच कसोटीची वेळ आहे. कोणीही गर्दी करणार नाही या साठी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करुन लाॅकडाऊन काळात गर्दी कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ आली तर अराजकता माजेल. असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

घरात बसून राहणे कठीण आहे तरी पण हीच संयमाची वेळ आहे. अजुनही वेळ गेली नाही. घरातच रहा, फिरु नका अन्यथा मिलीटरी रस्त्यावर आणुन बंद पाळावा लागेल. कारण १ टक्के जरी कोरोना संक्रमीत लोक शिल्लक राहीले तरी बाकीच्या ९९ टक्के लोकांना पुन्हा लागण होण्याचा धोका आहे. दुर्दैवाने १३५ कोटी जनते पैकी १ टक्के लोकांचा मृत्यू झाला असे गृहीत धरले तरी एक कोटी पस्तीस लाख लोक मरतील याचा विचार करा. अराजकता माजेल यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे संपूर्ण देशातच एकाचवेळी एकत्रीत पणे सलग पंधरा दिवस कमीतकमी १५ एप्रिल पर्यंत तरी काटेकोरपणे लाॅकडाऊन घरात बसूनच पाळला गेला तरच कोरोनाचे संक्रमण थांबेल. यासाठीच अशी विनंती शासनाला करुन बंद पाळा तीन दिवस चार दिवस असे टप्प्या टप्प्या मध्ये, आज इथे उद्या तिथे असे बंद पाळून काहीही उपयोग होणार नाही.

भाजीच्या, किराणाच्या कारणे अत्यावश्यक सेवा म्हणुन याला त्याला सवलत असे करु नका, पंधरा दिवस घरातील कडधान्य वापरा. आपण पाहतो अनेकजण दंडूक्याचा मार वाचविण्यासाठी भाजी आणायला जातो म्हणुन पोलीसांना भासवून फिरतायत, गर्दी करतायत हे चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे, ते चुकीचे आहे. असा अभ्यासपूर्ण, वास्तववादी संदेश देणारी चित्रफीत प्रेसिडेंट ऑफ मायक्रोबायोलाॅजीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डाॅ ए. एम. देशमुख यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे, ती खरोखरच आजची स्थिती दर्शविणारी आहे. माणगांव व्यापारी असोसिएशनचे बाळा दळवींनीही असाच संदेश दिला आहे या बाबतीत खासदार सुनिल तटकरेंनाही आपण विनंती करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

माणगांवातील सगळेच व्यापारी नियम, बंद पाळतायत पण तरीही काही लोक गर्दी करीतच आहेत. ही स्थिती आटोक्यात आली नाहीतर दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. आम्हालाही आमच कुटुंब आहे, अस काहींच वास्तववादी म्हणन आहे. १ टक्के समाज विघातक कृती करणारे लोक आज ९९ टक्के शासनाच्या सूचनांच पालन करीत, घरी बसून कोरोना व्हायरस शी मुकाबला करणाऱ्या लोकांचे मनोबल खच्ची करतायत. यांचा बंदोबस्त करण्यासाठीच शासनाला विनंती करावीच लागेल. पोलीस प्रशासन डाॅक्टर सगळेच सांगतायत मग ९९ टक्के जनतेला वाचविण्यासाठी मिलीटरीला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणावी लागेल तरच आपण हा लढा जिंकू शकतो.

आज इटली, अमेरिका, इंग्लंड आणि इतर देशांची अवस्था पाहता तसेच चिन मध्ये तर पून्हा लागण लागली आहे. हे देश सहा सहा महिने लाॅकडाऊन करत आहेत. अर्थव्यवस्था हादरली आहे. ते देश श्रीमंत आहेत आपल्या देशात बेसुमार सुशिक्षीत बेरोजगारी, मंदी, दुष्काळ, गरीबी, भुकंप, आपत्ती, अवर्षण, शेतकरी आत्महत्या या संकटांचा सामना करताना अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. अशातच देशात राज्यात पुन्हा पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल आणि सर्वात महत्वाचे आपलेच कुटुंब यात बळी पडू नये असे वाटत असेल तर सहकार्य करा अशीच ही वेळ असल्याचे चित्र आहे. स्वतःच कुटुंब सांभाळणार प्रत्येकजण त्याच्या कुटुंबासाठी अत्यावश्यक सेवाच करतो देशाला कर रुपाने मदत करतो. प्रत्येक व्यक्ती देशासाठी अत्यावश्यकच आहे, म्हणुन आयुष्यभर नको पण काही दिवस संकट टाळण्यासाठी घरी रहा. शासनानेही याचा विचार करुन निर्णय घ्यावे असेही लोक बोलतात कारण काही खाजगी कंपनी चालू करण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी स्वतः आवाहन करीत आहेत, या मुळे नेमकी काय परिस्थिती आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या