१४ एप्रिलनंतरही मुंंबई - पुण्यात लॉकडाउन वाढणार ?
पोलीस प्रवाह स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र : राज्यात मुंबई, पुण्यासह काही शहरांमधील कोरोना ग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. धारावी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही रुग्ण सतत वाढत आहेत, त्यामुळे एमएमआरडीएसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर या भागातील लॉकडाऊन काही काळ वाढवला जाईल, अशी माहिती समोर येत आहेत .
रुग्णांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढणे अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे लगेचच काही निर्णय घेणे व लॉकडाऊन काढणे घाईचे ठरेल . राज्यात जवळपास १० ते ११ असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतर असे जिल्हे अंतर्गत व्यवहारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी लागू असेल, त्यांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही असे महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहमत -
मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीतही बहुतेक सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली; मात्र केंद्र सरकारशी सल्लामसलत करून लॉक डाऊन वाढवण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी बैठकीत सांगितले.
अर्थव्यवस्थेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे -
अर्थव्यवस्थेच्या चिंतेपक्षा माणसांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ कसा व केव्हा उठविताना याचा विचार प्रामुख्याने केला जायला हवा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या