संचार बंधीत्त साधला जुगाराचा डाव ; खेळणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल.

संचार बंधीत्त साधला जुगाराचा डाव ; खेळणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल.

माणगाव - परेश शिंदे.

      माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावचे उत्तर दिशेला रोडच्या बाजूस असलेल्या अंब्याच्या झाडाखाली, जमिनीवर हातरलेले चटईवर बसून दिनांक ६ एप्रील २०२० रोजी १९ .०० वाजता विनापरवाना जुगार खेळताना, प्रत्येकाचे हातात तीनपत्ता घेऊन भारतीय चलनातील पैसे लावून, जुगार खेळतानाचे स्थितीत आढळून आल्याने, सात जणांना रंगेहाथ पकडून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रविवार देि.६ एप्रिल २०२० रोजी सायं. ७ वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक याठिकाणी घडला. या गुन्ह्याची फिर्याद माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल /१९५१ गोविंद भानुदास तलवारे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या गून्ह्या तील आरोपींची नावे १) संदेश रामचंद्र कदम - वय ३१, २) कल्पेश प्रमोद जाधव - वय ३०, ३) संजय रामचंद्र उंडरे वय - ३८ , ४) प्रसाद शंकर भोपलबडे वय - ४५, ५) सखाराम बाळू शेलार वय - ३१, ६) नितीन देवेंद्र डिगे वय - २५, ७) सुरज सुरेश सवातकर वय - २५, सर्व राहणार कोस्ते बुद्रुक ता. माणगांव या प्रत्येका जवळील वापरात असलेले किंमती मोबाईल सिमकार्ड सह व त्यांची अंग झडती घेतली असता प्रत्येका जवळ मिळून आलेल्या भारतिय चलनातील नोटा अशा स्वरुपात मोबाईलची किंमत्त रुपये व जप्त केलेली रोख रक्कम एकुण रुपये २५,७५० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना बेकायदेशीर तीनपत्ते त्यावर पैसे लावून जुगार खेळणे व कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जारी केलेल्या आदेशाची अवमान्यता करून कोरोना आजार पसरवायची  घातक कृत्ये केल्या प्रकरणी सदर आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ६६/२०२० मुंबई जुगार अधिनियम १२ (अ) भा. द. वि. कलम १८८, २६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या