आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील रस्त्यांवर जनजागृतीपर संदेश
जामखेड :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आपला जीव धोक्यात घालत कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही नागरिक संचारबंदी मध्ये विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याच पाश्र्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील नगर रोड, जयहिंद चौक, बीड रोड कॉर्नर येथुन प्रवेश करताना रस्त्यांवर जनजागृतीपर संदेश रेखाटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा शहरातील अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. महसूल प्रशासन, जामखेड नगरपरिषद , पोलीस अधिकारी, कर्मचारी वारंवार कोणीही बाहेर पडू नये असे अवाहन करत आहेत. मात्र, पोलीसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत.
सागर पवार
पोलीस प्रवाह न्युज, पुणे





0 टिप्पण्या