कोरोना प्रतिबंधासाठी माणगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांचे पथसंचलन.!

परेश शिंदे - प्रतिनिधी रायगड.


माणगाव : दि. ८ -- सध्या पूर्ण जगभरात तसेच भारतामध्ये
 कोरोना सारखे महामारी रोगाने थैमान घातले आहे. मुंबई - पुणे या ठिकाणी आधिक रुग्ण आढळून येत असल्याने
महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यामध्ये सुमारे पंधरा दिवस संचारबंदी लागू केलेली आहे तरीदेखील कोरोना सारखे महामारीच्या रोगांच्या संख्येमध्ये पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
 संसर्ग शासन व प्रशासनाचे बदलणारे अध्यादेश व नागरिकांच्या आरोग्याच्या हित-द्रुष्टीने पोलीसांची व संपुर्ण पोलीस  प्रशासनाची सध्यस्थितीत असणारी भुमिका अनन्यसाधारण आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय भुमिकेत असणारी खाकी वर्दी समाजहितासाठी नागरीकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते.
याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे माणगांव तालुका पोलीस ठाण्याने दिनांकस 8 एप्रिल रोजी काढलेल पथ संचलन (रूट मार्च) माणगांव पोलीस ठाणे ते शहरातील वाहतुक पोलीस चौकी ते निजामपुर रोड कँनाँल साईनगर ते पोलीस ठाणे माणगांव व कचेरी रोड मुंबई गोवा हायवे असा होऊन वाहतुक पोलीस चौकीसमोर पोलीस परेड ने समाप्त झाला हा रूट मार्च माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बुरुंगुऴे यांच्या उपस्थितीत काढण्यात आला या परेडमध्ये 45 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकारी सहभागी होते, या रूट मार्च मध्ये सुरक्षित आंतर ठेऊन कडण्यात आले तसेच रूट मार्च हा कोरोना लाँकडाऊन पार्श्वभुमी,हनुमान जयंती, व शब-ए-बारात या उत्सवांच्या काऴात लोकांनी समुदायाने एकत्र येऊ नये कोणत्या ही प्रकारचे जमाव करू नये,आरोग्याची काऴजी घ्यावी व लोकांमध्ये जनजाग्रुती व्हावी या उद्देशाने काढला असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले.

                   पोलीस प्रवाह न्यूज रायगड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या