अहमदनगर प्रतिनिधी:
कोरोना च्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रात काही भागात चिंताजनक परिस्थिती आहे तर काही भागात दिलासा देणारे चित्र आहे, गृहमंत्री एकीकडे काठीला तेल लावून पोलिस प्रशासनाला काम करायला सांगतात एकीकडे विशिष्ट कुटुंबातील व्यक्तींना फिरण्याची सवलत मिळते ही दुटप्पी भुमिका राज्याच्या हिताची नाही अशी टीका कडूस पाटील यांनी केली आहे. या कठीण प्रसंगात पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे जीवाची बाजी लावून सामान्य जनते साठी लढत आहेत असे चित्र आहे. आज जर पाहिले तर पोलीस अधिकारी आणि डॉक्टर व कर्मचारी एक प्रकारे तोफेच्या तोंडावर असल्या सारखे काम करत आहेत, असे वक्तव्य कृषि पदवीधर संघटनेचे महेश कडूस पाटील यांनी केले आहे. विमा संरक्षण राज्य सरकार ने देण्याचे घोषित केले आहे परंतु विमा हा नंतर ची किंवा दुर्दैवी घटनेतील बाब असते, या उलट माझ्या माहिती नुसार सरकार ने पगार देखील आता अडवून ठेवला आहे. अशा परिस्थितीत काम करून पगार अडवून न ठेवता या काळातला दुप्पट पगार सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना दिला गेला पाहिजे अशी मागणी कृषि पदवीधर संघटनेची आहे गृह मंत्र्यांनी याची दखल घ्यावी आहे अशी मागणी कडूस यांनी केली आहे. हि परिस्थिती हाताळल्या नंतर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता आहे. या करता राज्य शासनाने त्यांना या बिकट परिस्थितीत काम केल्या बद्दल तीन महिन्यांचा किंवा लॉक डाऊन जेवढा काळ राहील त्या काळातील पगार दुप्पट दिला पाहिजे. याच बरोबर नर्स किंवा द्वितीय तृतीय श्रेणीतील वैद्यकीय कर्मचारी यांचा देखील विचार राज्य सरकार ने करणे आवश्यक आहे असे कडूस म्हणाले. सरकार हे दुटप्पी भुमिका घेत आहे एकी कडे पगार थांबवत आहेत एकीकडे विशिष्ट कुटुंबातील व्यक्तींना राज्यात फिरण्याची सवलत देत आहेत. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुशिक्षित पदवीधरांनी पुढाकार घेऊन सोशल डिस्टनसींग पेक्षा ही पुढे जाऊन सोशल पोलिसिंग करून जे नियम तोडत आहेत त्यांना समज दिली पाहिजे असे हि ते म्हणाले.


0 टिप्पण्या