गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी
गोरेगाव : दि १३ - स्वदेश फाउंडेशन च्या वतीने कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाला व जिल्हा रुग्णालयाला 1 लाख ट्रिपल लेयर मास्क,5 हजार N 95 मास्क,2 हजार 500 पी पी ई किट,2 थर्मल स्कॅनरचे हस्तांतरण स्वदेश फाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
तसेच माणगाव, तळा, सुधागड, पोलादपूर, श्रीवर्धन, महाड, म्हसळा या तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व कर्मचारी, पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांना 10 हजार ट्रिपल लेयर मास्कचे वाटप करण्यात आले.अतिगरजू अशा 114 आदिवासी वाड्यांमध्ये स्वदेस फाउंडेशनतर्फे एका महिन्याचे रेशनचे साहित्य व किराणा देण्यात येत आहे. मुंबईमधील दवाखान्यांमध्ये आतापर्यंत 16 हजार 990 जेवणाचे पॅकेटस् डॉक्टर्स व नर्सेस यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती स्वदेस फाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिली.
करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वदेस फाउंडेशन करीत असलेल्या कामाचे कौतुक करून स्वदेस फाउंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व संपूर्ण स्वदेस टीमचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष आभार मानले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर व स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ समन्वयक नयन पोटले उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्या सर्व दानशूर व्यक्तींचे,संस्थांचे आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी असेच पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Goregaon#Maharashtranews

0 टिप्पण्या