शिर्डी -
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारत सरकार व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन केल्यामुळे दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायोजनेकरीता संस्थानच्या वतीने विविध उपायोजना व उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
श्री.डोंगरे म्हणाले, जगभरात व देशाभरात थैमान घालणा-या कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यास तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने विविध उपाययोजना व उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये सर्व प्रथम या आजारा विरुध्द प्रतिबंधात्मक उपायोजनेकरीता संस्थानचे अधिकारी व कर्मचा-यांना कोरोना व्हायरसबाबत व निर्मूलनासाठी विशेष माहिती होण्याकरीता दिनांक ०७ मार्च रोजी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नवी दिल्ली (नॅशनल डिझास्टर रिस्पोन्स फोर्स (NDRF) यांच्या वतीने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना केलेल्या होत्या. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करु नये असे निर्देश देण्यात आलेले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक १७ मार्च रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीच्या वतीने घेतला असून मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर संस्थानच्या सर्व विभागांनी स्वच्छतेचे कामी हाती घेवून संपुर्ण मंदिर परीसर व दर्शनरांगा लिक्वीड सोपने स्वच्छ करण्यात आल्या, दर्शन रांगेतील स्टिल रिलींग, दरवाजे व भिंती सोडीयम हायपोक्लाराईड आणि डायक्लोरो या जंन्तु नाशकाने निर्जंतुक करण्यात आल्या. तसेच संपुर्ण मंदिर परीसरात डेल्टा मेथ्रीन हे किटकनाशक औषध वापरुन धूर फवारणी करण्यात आली. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये १० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले. तसेच जनजागृती करीता प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून माहितीचे फलक मंदिर परिसर, सर्व भक्तनिवासस्थाने, श्री साईप्रसादालय, दोन्ही रुग्णालये व इतर आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात आले.
याबरोबरच संस्थानचे श्री साईप्रसादालय व भक्तनिवासस्थाने ही बंद ठेवण्यात आले. संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शन पासेस व आगाऊ निवासी खोल्या बुकींग बंद करण्यात आले. तसेच दिनांक ०१ एप्रिल ते दिनांक ०३ एप्रिल २०२० याकाळात साजरा करण्यात येणारा श्रीरामनवमी उत्सव रद्द करण्यात आला. उत्सव रद्द झाल्यामुळे पालख्या घेऊन शिर्डी येथे येऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने पालखी पदाधिका-यांना पत्र पाठवुन आवाहन करण्यात आले. मंदिर बंद बाबतची माहिती साईभक्तांना ई-मेल, दुरुध्वनी, संकेतस्थळ व प्रसार माध्यामांव्दारे देण्यात आली होती. श्री साईप्रसादालयाच्या वतीने दिनांक १८ मार्च २०२० पासुन दररोज सुमारे २००० व्यक्तींकरीता जेवण तयार करण्यात येत असून श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डीजवळील निघोज येथील पालखी निवारा येथे सुमारे २५० निराधार व गरजुंना आणि संस्थानच्या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्वच्छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना दोन्ही वेळचे भोजन सुरक्षित अंतर ठेवून निःशुल्क पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोपरगांव परिसरातील मतिमंद, बेवारस, अनाथ, दवाखान्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, वृध्द यांना दररोज अन्न पाकिटे पुरविण्यात येत आहेत.
दिनांक २७ मार्च रोजी कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीने घेतला. दिनांक २९ मार्च रोजी लॉकडाऊनमुळे ६६ बसेसव्दारे कर्नाटक राज्यातुन सुमारे २५०० मजुर राजस्थानकडे आपल्या मुळ गावी निघालेले होते. हे सर्व शिर्डी येथे आले असता संस्थानच्या वतीने या सर्वांना अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. राज्यासह अहमदनगर जिल्ह्यायातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भावमुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवुन संस्थानच्या वतीने दिनांक ०५ एप्रिल रोजी श्री साईधर्मशाळा भक्तनिवास येथे इमारत क्र.A विंग तळ मजल्यावर ०८ हॉलमध्ये एकुण ८० खाटांचे संशयित रुग्णांकरीता विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.
कोरोनाग्रस्ताची वाढती संख्या व बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा ही बाब लक्षात घेवून आमदार रोहित पवार यांनी बारामती अॅग्रोच्या वतीने श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता १०० लिटर सॅनिटायझर दिले असल्याचे ही श्री.डोंगरे यांनी सांगितले.#shirdi#sai baba temple# Ahmadanagar


0 टिप्पण्या