महाराष्ट्रासमोर कोरोनासोबतच अन्य संकटेही- शरद पवार.!


पोलीस प्रवाह न्यूज
मुंबई : दि. १५ -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.शासनाने योग्य ती खबरदारी घेऊन जिल्हा, तालुका पातळीवर योग्य ती काळजी व उपाययोजना आताच करायला हव्यात. पाणी संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

द्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात बेकारी व बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी, अशी सूचनाही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांचे नसून आर्थिक क्षेत्रात यावर मात करण्यासाठी पुढील एक-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. यासाठी केंद्राने अजून खबरदारी घ्यायला हवी, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

संपूर्ण विश्वात आज एकाच समस्येची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोनाचे संकट. कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे. भारतातही केंद्र सरकार व राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे सगळेजण कोरोनाला पराभूत करण्यासाठी धीराने उभे राहिले आहेत. अर्थकारणावर या महामारीचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजारपेठेला मर्यादा आल्या आहेत. शेतीवरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारात येण्यास संकटं येत आहेत. हातात आलेले पीक सोडून देण्याची भूमिका शेतकऱ्याला घ्यावी लागतेय, हे खूप धोक्याचे आहे, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केली. पवारांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.
                      पोलीस प्रवाह न्यूज
#BandraStation#sharadpawar#uddhavthackeray

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या