वांद्रे गर्दी प्रकरणावरुन शरद पवारांचे आवाहन.!


पोलीस प्रवाह न्यूज
मुंबई : दि. १५ -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या काही सूचना केल्या आहे त्यांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. तसंच वांद्रे इथं जमलेल्या गर्दीवर त्यांनी परखड भाष्य केलं आहे.

'वांद्रे इथं कुणी तरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोकं तिथे जमा झाले होते. प्रामुख्याने आपण डिस्टसिंगच्या सुचना केल्या आहे, त्याचं पालन केलं गेलं नाही. कुणीही अशा अफवा पसरवू नये, वांद्रे इथं जे घडलं ते पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे'

'लॉकडाउनमुळे अनेक राज्यामध्ये सीमाबंद करण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील मजूर अडकले आहे.  अनेक जण आपल्या गावाकडे जाण्यासाठी आग्रही आहे. साहजिकच सर्वांना घराकडे जाण्याची ओढ असेल. पण, राज्यावर आलेलं संकट पाहता त्यांना राज्याबाहेर जाण्याची परवानगी नाही. राज्यात अनेक ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी अन्नदान दिलं जात आहे. राज्य सरकार आणि सामजिक संस्थांकडून मदत पुरवली जात आहे, त्यामुळे या संकटाच्या काळात सर्वांनी साथ देणे गरजेचं आहे', असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
                            पोलीस प्रवाह न्यूज
#BandraStation#sharadpawar#uddhavthackeray

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या