कोरोना पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना- प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर.!


गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी

माणगाव : दि.१६ - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माणगांव उपविभागात प्रत्येक गावामध्ये कोव्हिड वॉरिअर ग्रुप तयार केले आहे. त्यामध्ये त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य ई. समाविष्ट केलेले आहे. व त्यांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी दिलेली आहे.

    तसेच मा. प्रधानमंत्री गरीब योजना अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय शिधापत्रिकेवरील लोकसंख्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी माहे एप्रिल २०२० ते माहे जून २०२० या कालावधीकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्य व्यतिरिक्त अन्नधान्य प्रतिसदस्य मोफत वितरित करण्याचे शासनाने आदेश निर्गमित केलेले आहेत.

 तसेच एन. पी. एच. शिधापत्रिका लाभार्थ्यांना माहे मे २०२० ते जून २०२० या कालावधीसाठी प्रति शिधापत्रिका गहू रु. ८/- व तांदूळ रु. १२/- या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य माहे मे २०२० ते जून २०२० या दोन महिन्याच्या कालावधीत वितरित करण्यात येणार आहे.

    माणगांव उपविभागातील माणगांव, तळा या तालुक्यांसाठी मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी माहे एप्रिल २०२० ते जून २०२० या महाकरिता मंजूर केलेल्या नियतनाप्रमाणे तहसील कार्यालय माणगांव व तळा यांचेकडून प्राधान्य कुटुंबातील पात्र शिधापत्रिका धारकांना व अंत्योदय योजनेमधील पात्र कुटुंबियांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ या परिमाणात मोफत अन्नधान्याचे वितरण तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार याना केलेले असून सदर मालाची उचल संबंधित दुकानदार यांनी केलेली आहे.

   राज्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे सदरच्या कालावधीमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वितरित आलेले धान्य रास्त भाव धान्य दुकानदार यांचेकडून संबंधित पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोच होणाऱ्या धान्य वाटपामध्ये पारदर्शीपणा येण्यासाठी या उपविभागात माणगांव व तळा तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानांची तपासणी करण्यासाठी माणगांव उपविभागात अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

  त्याचप्रमाणे रेशनिंग दुकानदार हे अन्नधान्याचे वाटप संबंधित कार्डधारकांना कशा प्रकारे करीत आहेत. याबाबत तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील रास्त भाव धान्य दुकांनदारांवर करडी नजर ठेवणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच रेशनिंग दुकानदार यांना अन्नधान्याचे वाटप करताना सोशिअल डिस्टन्स राखूनच अन्नधान्याचे वाटप करण्याबाबत कळविले आहे.
                       
                          पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या