पोलीस प्रवाह न्युज
मुंबई : दि . १५ - कॅल्शिअम शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. आपले दात आणि हाडांमध्ये 99% कॅल्शिअम असतं. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता होते त्यावेळी हाडे कमकुवत आणि नाजुक होतात. अशात काही घरगुती उपायांनी शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढविणे शक्य होते.
१. दूध - दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा चांगल्या प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.
२. दही : दहीमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 देखील असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम मिळते. शिवाय जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप 2 मधूमेह, ह्रदयरोगासारखे मेटाबॉलिक विकार होण्याचा धोका कमी असतो.
३. कडधान्ये आणि डाळी : डाळी आणि कडधान्ये कॅलशियमचा एक उत्तम स्त्रोत आहेत. शिवाय यांच्यामध्ये फायबर,प्रोटिन्स,मायक्रो न्युट्रिएंट्स, लोह, झिंक, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियमदेखील भरपूर असतात.
४. गूळ : गूळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. मात्र कॅलशियम मिळावं यासाठी भरपूर गुळ खाऊ नका. कधी कधी चणे आणि गुळ खाणे फायद्याचे ठरू शकते.
५. सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#calcium #healthtips #policepravahnews

0 टिप्पण्या