*कु.अनन्या आनंद शेळके मंथन राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात ४ थी तर पुणे जिल्ह्यात व जुन्नर तालुक्यात प्रथम*



प्रतिनिधी नारायणगाव  - प्रा. राजेंद्रकुमार शेळके

नारायणगाव तालुका जुन्नर येथील ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती एस.आर.केदारी बालक विद्यामंदिर मधील इयत्ता ४ थी मधील विध्यार्थीनी कु.अनन्या आनंद शेळके. हिने मंथन या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात ४ था क्रमांक तर पुणे जिल्ह्यात व जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक व विद्यमंदिरातही प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने व विद्यालयाचे वतीने तिचे विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. परंतु सध्या लॉक डाउनचा कालावधी असल्याने हा विषेश सन्मान हा कालावधी संपल्यावर एका मोठ्या कार्यक्रमात केला जाईल अशी माहिती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.पारखे मॅडम यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
तिच्या यशाबद्दल नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश भाऊ पाटे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले.
कु.अनन्या हिच्या यशामध्ये तिचे आई वडील, आजी आजोबा, वर्ग शिक्षक सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कु.अनन्या ही कवी लेखक व पत्रकार श्री.राजेंद्रकुमार शेळके यांची पुतणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या