रविंद्र कुवेसकर , प्रतिनिधी
माणगांव : दि. २१ -सध्या कोरोनासंकट सुरु आहे. आपण सगळेजण घरीच राहाणे सुरक्षिततेचे आहे. अशातच तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. पाणी पिण्याचे प्रमाण व तहान वाढली आहे. कोरोना संकटाशी लढताना सर्वांनाच सतत हात धुणे अत्यावश्यक झाले आहे. लाॅकडाऊन मुळे सर्व कुटुंबिय घरात एकत्र असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. तरी जागरूक नागरिकांनी पाण्याचा वापर शक्यतो गरजेनुसारच करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी हे जीवन आहे, ते जपून वापरावे. स्वच्छतेचे सारे नियम काटेकोरपणे पाळून, कोरोनाला पळवून लावुयात. पाणी वाचवा, देश वाचवा ती काळाची गरज आहे. असे आवाहन माणगांव नगरपंचायतचे विद्यमान पाणीपुरवठा सभापती जयंत बोडेरे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात काळनदीच्या पाण्याची पातळी हळुहळु खालावत जाते. पाण्यात शेवाळ तयार होते, पाणी पिवळसर होत आहे. जलशुध्दी केंद्रात पाणी फिल्टरेशन करतांना तुरटीचा व टीसीएल पावडरचा नियमीत वापर होत आहे. तरीही नागरिकांनी पाणी उकळून, गाळून प्यावे प्रत्येकाने काळजी घ्यावी. ऐन उन्हाळ्यात पाण्याची बोंब होऊ नये म्हणून आपली नगरपालीका मुख्याधिकारी राहूल इंगळे आणि ज्युनियर इंजिनियर आकाश बुवा यांच्या मार्गदर्शनात योग्य ते नियोजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच खासदार सुनिल तटकरेंच्या प्रयत्नांतून जलशुद्धी केंद्रात अद्यावत नविन पॅनल बोर्ड, नविन मोटरपंप बसविण्यात आले आहेत. आपणास पाणी टंचाई भासू नये म्हणून नगरपंचायतीच्या वतीने योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा आजवर सुरळीत सुरु आहे.
माणगांवकरांना काळप्रकल्प कालव्याच्या पाण्यामुळे आजवर पिण्याच्या पाण्याचा म्हणावा तितकासा प्रश्न निर्माण झालेला नाही. मुबलक पाणी आहे. वाढते उष्णतामान व काळनदीवर सुरक्षित पाणीसाठा बंधारे नसल्याने; गेल्या एकदोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याची पातळी लवकरच खालावते. यंदा कोरोना संकटाशी आपण सर्व लढा देत आहोत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी माणगांवकरांनी जागरूकता दाखविली आहे. तशीच जागरूकता पाणी टंचाईवर मात करण्यासाठीही दाखविणे गरजेचे आहे. तरी सर्व माणगांवकरांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या