रायगड जिल्हा, प्रतिनीधी.
आलिबाग : दि १२ - सध्या कोरोना (कोव्हिड-१९) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी घोषित केलेल्या संचारबंदीचे काळात शिधापत्रिका धारकांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानां मार्फत शासनाकडून स्वस्त दरात धान्य विक्री केली जात आहे.
परंतु काही सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान मालक स्वतःचा अवाजवी आर्थिक फायदा करून घेण्याकरिता अशा आणीबाणीच्या प्रसंगीसुद्धा शिधापत्रिका धारकांना वाटप करण्याकरिता त्याचे ताब्यात देण्यात आलेले धान्य हे शिधापत्रिका धारकां व्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने विक्री करीत असल्याची माहिती, पोलीस अधिक्षक रायगड अनिल पारस्कर यांना मिळाली. त्या माहितीची खारतजमा करून असे गैर कृत्य करणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दि. ११ एप्रिल राजी सायंकाळी ६..५० वा. च्या सुमारास आरोपी राहुल विलास जगे वय ३७ वर्ष व विलास जयराम जगे वय ७० वर्ष दोन्ही रा. ठिकरूळ नाका ता. अलिबाग याच्या मालकीचे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ व गहू शिधापत्रिका धारकांना प्रतिकीलो ३ व २ रु. दराने विक्री करण्याचा शासनाचा नियम असून दोन्ही आरोपी यांनी संगनमताने शिधापत्रिका शिवाय लाभार्थी नसलेल्या इसमांना स्वतःचे फायद्याकरिता काळाबाजर करून बेकायदेशीर विक्री करीत असताना मिळून आले. त्याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र. नं. ६१/२०२० जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोसई खाडे ह्या करीत आहेत.
तसेच दि. ११ एप्रिल रोजी रात्री १२.२० वा. सुमारास मैजे तळवली येथील मारुती मंदिराच्या आडोशाला आरोपी तन्मय मंगेश पाटील रा. कार्ले ता. अलिबाग व आरोपी निखिल पाटील रा. आक्षी ता. अलिबाग यांनी एकूण ११२५/- रु. किमतीची विदेशी दारू विक्री करण्याकरिता स्वतःचे ताबे कब्जात बाळगुन मिळून आले. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु. र. नं. ६०/२०२० दारूबंदी अधिनियमचे कलम ६५, डी, ई, एफ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. आर. बी. निगडे हे करीत आहेत.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#raigad#Maharashtranews

0 टिप्पण्या